पिग्मी / देनंदिन ठेव योजना

'थेंबे थेंबे तळे साचे' ही म्हण पैशांच्या बाबतीतही सर्वार्थाने लागू पडते. जर रोज थोडी थोडी ठराविक रक्कम आपण शिलकीत टाकत गेलो तर आपल्याही नकळत काही काळानंतर त्याचा फायदा आपल्याला दिसायला लागतो. अशी जमवलेली रक्कम कुठल्याही छोट्या स्वप्नांना पूर्ण करायला अथवा आकस्मिक संकट काळासाठी कामात येते. रोज थोडी रक्कम बाजूला काढल्यामुळे खिशावर कोणता ताणही येत नाही आणि आर्थिक नियोजनाची सवय लागते ती वेगळीच. यासाठी लातूर मल्टीस्टेटच्या पिग्मी/दैनंदिन ठेव योजनेचा लाभ घ्या.

Apply Now