संस्थेविषयी
शाखा
आनंदी ग्राहक
कर्मचारी
दिवस अविरत सेवा
आपल्या सगळ्यांना जर समृद्ध व्हायचे असेल तर सहकाराला पर्याय नाही हे नक्की. संकल्प तत्वाचा हा धागा पकडून २०१२ साली निर्मिती झाली ती लातूर सहकारी संस्थेची. लातूर आणि परिसरातील प्रत्येक तरुणाला आणि शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी दुसरीकडे जाण्याची गरज पडू नये म्हणून लातूर मल्टिस्टेटचे कार्य तेव्हापासून अखंड सुरु आहे. बघता बघता मल्टीस्टेटमध्ये ही संस्था परावर्तित होऊन सध्या त्याच्या ८ ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.
संस्थेच्या मार्फत बँकिंगच्या विविध सेवा पुरवल्या जातात. यामध्ये सगळ्या प्रकारच्या ठेव योजना तसेच कर्ज योजनासुद्धा आहेत. काळानुरूप संस्थेने स्वतःला अद्ययावत ठेवून सर्व प्रकारची डिजिटल बँकिंग सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. या सगळ्याच योजनांचा आणि सुविधांचा यशस्वीरीत्या फायदा संस्थेचे हजारो सभासद घेतात आहे. वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सूचनांचा आदर करत सेवेमध्ये प्रगती करण्यात येते. पारदर्शी कारभार, तत्पर सेवा, संपूर्ण सुविधा आणि आपलेपणा या चार सूत्रांवर संस्था काम करते. संस्थेत आलेल्या सभासदाला सेवेचे समाधान मिळावे यासाठी संस्थेचे कर्मचारी झटत असतात xम्हणूनच व्यवहारापलीकडचं नातं इथे तयार होतं आणि तीच आमची खरी संप्पती आहे. भविष्यातही लातूर मल्टिस्टेट परिवाराच्या प्रत्येक सभासदाला जास्तीत सेवा सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अध्यक्षांचे मनोगत
जे. जी सगरे
संस्थापक
लातूर जिल्ह्यातल्या नामांकित व अग्रगण्य बँकिंग संस्थांमध्ये ज्याचा वरचा क्रमांक आहे ती म्हणजे आपली लातूर मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. लातूर.
मा. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रेरणेतून मा. श्री. अमितभैय्या विलासराव देशमुख (माजी राज्यमंत्री तथा आमदार, लातूर) यांच्या शुभहस्ते नोव्हेंबर, 2012 मध्ये या संस्थेचा शुभारंभ झाला. परिणामस्वरूप कोअर बँकिंगची नियोजनपूर्वक आखलेली कार्यप्रणाली, पारदर्शक व्यवहार, तत्पर सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मदत या तत्वांवर संस्थेची जोरदार वाटचाल सुरु आहे. मागील 8 वर्षात लातूर मल्टिस्टेटने अनेक राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली. या 8 वर्षात लातूर मल्टिस्टेटच्या परिवारात हजारो सभासदांची वाढ झाली. आपल्या ग्राहकांना, सभासदांना त्यांच्या गरजा समजून, समस्यांवर उत्तरं शोधून पण विनाविलंब सेवा द्यायची या सूत्राला रोज डोळ्यांसमोर ठेवून लातूर मल्टिस्टेटचे कर्मचारी सतत झटत असतात. याच्या परिणामस्वरूप लातूर मल्टिस्टेटच्या 7 हुन अधिक शाखा कार्यरत आहेत. अर्थविश्वाला अभिप्रेत अशा अत्याधुनिक कार्यप्रणालीचा अवलंब करून दर्जेदार काम, गतिमान सेवा व सेंट्रल रजिस्ट्रार को. ऑप. सोसायटी, नवी दिल्ली यांनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे कार्यप्रणाली इथे काम करते.
लातूर जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच या भागातील तरुणांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या ध्येयावर संस्था अग्रेसर आहे. अन्य सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा संस्थेचा मानस आहे.